उत्तर प्रदेश हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 महिने रूममध्ये कोंडून अत्याचार

0
314

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 13 महिने एका रूममध्ये बंदी करून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. इतकंच नव्हे तर तिला दुसऱ्या राज्यात विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी 4 लोकांना अटक केली आहे.

लखनऊ येथील एका अल्पवयीन मुलीला आरोपी उप्रेता कुमारने बंदी करून एका रूममध्ये ठेवले होते. त्यानंतर तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. इतकंच नव्हे तर तिला वेगवेगळ्या लोकांकडे घरकामासाठी ठेवले. तेथील लोकांकडून आरोपीने जादा पैसे घेऊन या मुलीला विकत होता. तो 15 दिवसांसाठी वेगवेगळ्या घरमालकांकडे तिला कामाला ठेवत असे. यामुळे ती मुलगी 5 महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर आरोपीने तिला दुसऱ्या राज्यात विकण्याचा प्रयत्न केला. मात्र लखनऊ पोलिसांनी आरोपी उप्रेता कुमारसह तिघांना अटक केली.

दरम्यान, या घटनेतील मुलीला पोलिसांनी एका हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असून त्या मुलीची प्रकृती नाजूक आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडे प्रकरणावरून मला धमकीचे फोन येत आहेत- किरीट सोमय्या

“धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेऊ नका, त्यांना संरक्षण द्या”

सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला

कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here