मुंबई : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही सीमेवरील स्थितीविषयी पंतप्रधानांना सत्य सांगण्याच आवाहन केलं आहे.
चीनच्या घुसखोरीला केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीननं भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात. तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
चीन के मुंहजोरी को कब मिलेगा करारा जबाब?बिना गोली चले हमारे 20 जवान शहीद होते है.हमने क्या किया?
चिनके कितने जवान मारे गये? चीन हमारे जमीन पर घुस गया है क्या?प्रधान मंत्रीजी इस संघर्ष के घडीमे देश आपके साथ है लेकीन सच क्या है?
बोलो.कुछ तो बोलो. देश सच जानना चाहता है.
जय हिंद!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी?- राहुल गांधी
शहीद जवानांना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…
मोठी बातमी…! गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी
जॉन सीनानेही वाहिली सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली; पोस्ट व्हायरल