बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- रामदास आठवले

0
275

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प केला होता. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. बॉलीवूडचे कलाकार मुंबई सोडून जाण्यास तयार नाहीत,” असं रामदास आठवले म्हणाले. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, बॉलिवूड मुंबईमंध्येच राहील याची ग्वाहीदेखील यावेळी त्यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी-

“बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का?”

बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का?- योगी आदित्यनाथ

“तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय”

हार्दिक पांड्या-रविंद्र जडेजाची फटकेबाजी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here