Home देश मोठी बातमी…! गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी

मोठी बातमी…! गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये लडाखजवळच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. यात चीनचे 43 सैनिक ठार झाले तर भारताचेही 20 जवान शहीद झाले. त्यानंतर दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातून आपापले सैन्य माघारी बोलावले आहेत. भारतीय लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकही गोळी या दरम्यान चालली नाही. पण दगड आणि रॉडमुळे भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही प्रतिहल्ला केला. त्यात चीनचे अनेक सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. तब्बल तीन तास ही झटापट आणि मारामारी सुरू होती.

दरम्यान, भारत-चीनमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी राजधआनी नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी उशिरा एक बैठक पार पडली.

महत्वाच्या घडामोडी-

जॉन सीनानेही वाहिली सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली; पोस्ट व्हायरल

वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक

शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे… ; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यात काहीच मजा नसणार- विराट कोहली