“ज्यांनी मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्या त्यांना वाचवायला बघत आहेत”

0
190

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा दावा करत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं.

“किरीट सोमय्या हे अर्णव गोस्वामी यांना वाचवायला बघत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, ज्यामुळे महिलेच्या पतीला आत्महत्या करावी लागली अशा माणसाला दिल्लीपासूनचे सर्व नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असां अनिल परब यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

“अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर”

…तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे- बच्चू कडू

“ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here