मनसेच्या ‘या’ एकमेव आमदाराच्या गाडीचा आपघात

0
413

मुंबई : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीचा आपघात झाला. ही घटना बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. राजू पाटील यांची कार उड्डाणपुलावरून खाली दिवा पनवेल रेल्वे मार्गावर कोसळली असून सुदैवाने यात कोणीतही जीवितहानी झाली नाही.

लाखो रूपये किमतीची महागड्या गाडीचा मात्र चक्काचुर झाला आहे. निळजे आणि दातीवली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या रोड ब्रिजवर हा अपघात झाला.

खदिर इनामदार हा मनसे आमदार राजू पाटील यांचा चालक त्यांच्या नातेवाईकांना डोंबिवलीला सोडून पुन्हा पलवासिटीकडे येत होता. त्यावेळी रस्ता चुकविण्याच्या प्रयत्नात गाडीचे नियंत्रण सुटून थेट गाडी दिवा पनवेल रुळावर कोसळली.

सुदैवाने याच वेळी कोणतीही रेल्वे रुळावरून ये जा करीत नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

महत्वाच्या घडामोडी-

-ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान.. अशी होते OTP फसवणूक

-भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी

-भाजपच्या ‘या’ खासदाराने दिला भाजपलाच घरचा आहेर; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणं ही चूक

-“सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here