मुंबई : आपल्या वाढदिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात दिला. आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली.
घणसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या जन्माला आलेल्या बाळाच्या जीवाला जन्मापासूनच धोका असल्याचं सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. बाळाच्या वडिलांकडे उपचार करुन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्रस्त पित्याने अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्याने त्याने पित्याची व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली.
आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. इतकंच नाही, तर यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून पित्याने आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, अफवांवर विश्वास नका ठेऊ”- उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो..; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला
जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस