मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नाही, त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज महाराष्ट्र काँग्रेसची बैठक झाली.
काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये झालेल्या बैठीकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे तीन पक्षांचे सरकार आहे. आमचे काही प्रश्न आहेत. आमच्याही काही मागण्या आहेत. आम्ही त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तरुणांनो घराबाहेर पडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या- रोहित पवार
शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना
राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या ऑफरवरून राजू शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले…
राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस