आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
प्रफुल्ल पटेल यांच्या 2004 ला काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला होता. ते भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. तरीदेखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : 2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर…; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
2004 च्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्लभाई सारखं सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळे भाजपमध्ये जाऊ, तासंतास त्यांनी आग्रह केला होता. शेवटी मी नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला
दरम्यान, शरद पवारांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात…; योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं?
पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोप