रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणची अवस्था वाईट झाली आहे. नुकसानग्रस्तांना जिथे ठेवलं गेलं आहे तिथली अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे. या सगळ्यांची राहण्याची सोय योग्य ठिकाणी केली पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत,असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, शेती, फळबागांचे झाले तर ते पुढच्या वर्षी भरुन निघत असते. पण इथे तर झाडंच राहिली नाहीत. पुढच्या 5 ते 10 वर्षांनी त्यांचे उत्पन्न सुरु होईल. अशा स्थितीत फक्त हेक्टरी मदत जाहीर करुन भागणार नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही- नारायण राणे
शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे; बापाला मुलाचं ज्ञान कमीच वाटतं- देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना आमदारकीची खुली ऑफर; तशी शरद पवारांचीच इच्छा
ते येत आहेत तर चांगलं आहे, ज्ञानात भर पडेल; कोकण दौऱ्यावरून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा