आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल थेट पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. त्यामूळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
ही बातमी पण वाचा : छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा?; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
महेश गायकवाड यांना सहा तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितलं.
दरम्यान, महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून गोळ्या काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; ‘नेटकरी म्हणाले ही तर…’
केंद्रीय अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प म्हणजे…’
छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी