आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार. लायकी आहे का? गर्दीत गारद्यांच्या शामील रामशास्त्री… सुरेश भट म्हणतात. आता मेल्याविन मढ्याला उपायच नाही. दुसरा उपायच नाही. आपण फक्त मढं पाहणार की लोकशाहीच्या खुन्यांचं मढं करणार. एकूणच जी काही थट्टा सुरू आहे. घटना नाही हे काय आहे. अनिल आणि असीम मी म्हणतो बरोबर की चूक ते सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी पण वाचा : 15 दिवसात मोठे भूकंप, विश्वास बसणार नाही असे नेते भाजपमध्ये येणार; भाजप नेत्याचा दावा
निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. त्यांनी कामाला लागलो होतो. 19 लाख 41 हजार शंभर रुपयांच्या स्टँम्पवर शपथपत्र पुरवली होती. निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का. एक तर ते स्वीकारा आमचा हक्क आम्हाला द्या. 19 लाख 41 हजार इनटू आम्हाला द्या. हा मोठा घोटाळा आहे. शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. ते काही दोन नंबरचे नाही. ईडी त्यांचे नोकर आहे. उघड बोलतो. काय करणार आहेत बघून घ्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का; मिलिंद देवरा करणार शिवसेनेत प्रवेश
बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका, म्हणाले…