आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली. यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, काळाराम मंदिरात येऊन त्यांनी साफ सफाई केली. याची खरंच गरज होती का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.
ही बातमी पण वाचा : राजकारणात मोठी खळबळ ; ‘या’ महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप
पंतप्रधान मंदिरात येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने मंदिरातील साफसफाईवर किमान सात ते आठ लाख रुपये खर्च केले. मंदिर अगदी चकाचक केले होते. मंदिर ट्रस्टने देखील सफाईसाठी २ लाख रुपये खर्च केले असे समजते. बऱ्याच ठिकाणी लादीवर रेड कार्पेट टाकले होते. तरीही देशाच्या पंतप्रधानांना हाती मॉप घेऊन पुन्हा साफसफाई करावी लागली. याचा अर्थ काय? सरकारने साफसफाईच्या नावाखाली फक्त लाखो रुपये उधळले की काय? असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार गट आणि भाजपला धक्का ; १५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर
अपेक्षा होती खरा निकाल लागेल मात्र…; अपात्रतेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
अपात्रतेचा निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने