आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्तळाजवळ शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला.
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थावर हा राडा झाला असून शिवतीर्थवर मोठा तणाव निर्माण झाला असून मोठ्या संख्येने पोलीस शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
ही बातमी पण वाचा : गजानन कीर्तिकरांवर टीका करताना, शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी ठाकरे गटाकडून गद्दार..गद्दार अशी घोषणबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले होते. शिंदे गटाचा कार्यक्रम झाल्याने त्यांनी शिवतीर्थावरुन बाहेर निघून जावे अशी मागणी ठाकरे गटाचे अनिल परब आणि अनिल देसाई यांनी केली. मात्र, शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथेच थांबल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.
महत्त्वाच्या घडामोडी –
दिपावली सणाचे औचित्य साधून गोपाळकृष्ण शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा
अजित पवारांसोबत झालेली भेट ही…; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया