मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस जीवाची बाजी लावून काम करत आहेत. पण या कोरोनाच्या युध्दामध्ये महाराष्ट्रातील तसंच देशातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याच परिस्थितीत पोलीस खात्यासाठी एक चांगली बातमी पुढे आली असून ही बातमी नक्कीच पोलीस खात्याला आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही. आतापर्यंत 2562 पोलिसांना करोनाची लागण झालेली असून 34 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
दरम्यान, या संदर्भात ANI ने ट्विट केलं आहे.
No new #COVID19 case reported in Maharashtra Police in the last 48 hours. Total coronavirus cases in the force stand at 2,562, death toll at 34: Maharashtra Police pic.twitter.com/rdTccgDFx3
— ANI (@ANI) June 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“मुख्यमंत्री केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच?;” भाजप आमदाराचा टोला
कोल्हापुरात शिवसेना, व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी
आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा राजनाथ सिंग यांना टोला
“कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; डॉ.अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र”