आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा गटातील आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोठी घोषणा केली आहे.
आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं तर कुठलचं सरकार राहणार नाही., असा इशारा झिरवाळ यांनी यावेळी दिला.
ही बातमी पण वाचा : “…म्हणून छगन भुजबळ भाजपसोबत गेले”
आदिवासीतून कुणाला आऱक्षण देता कामा नये. आम्हाला 47 जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण, 48 वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये. आपल्याला रडायचं नाही, तर लढायचं आहे. आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं तर कुठलचं सरकार राहणार नाही., असं झिरवाळ म्हणाले.
दरम्यान, आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी झिरवाळ बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
जयंत पाटीलही आमच्यासोबत येतील; अजित पवार गटातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य
“शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ संतापले, म्हणाले…”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”