“केंद्र सरकारची ई-पासबाबत नवीन सूचना; पण महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही”

0
166

रायगड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली आहे. ते रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नसेल. केंद्र सरकारने ई-पासबाबत नवीन सूचना दिल्या आहेत.  मात्र, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग पाहता ई-पासची सक्ती कायम राहिल, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी काही दिवसांनंतर ई-पास धोरणावर पुनर्विचार केला जाईल, असंही नमूद केलं.

केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो आहे. आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे- अजित पवार

“गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा डीएनए आहे”

कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा; शिवसेनेची मागणी

राहुल गांधी हे सक्षम, संयमी आणि संवेदनशील नेते; त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here