आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह अनेक आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. यानंतर अनेक घडामोडी घडल्या.
ही बातमी पण वाचा : “मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, तर…”
अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. खुद्द शरद पवार यांनीही अनेकदा आपण भाजप सोबत जाणार नाही, असं स्पष्ट केलं. अशातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं आहे.
सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांसोबत आणि आमच्यासोबत असलेल्या 54 आमदारांच्या सह्या आहेत. सत्तेत जाताना आपल्याला काय बोलले पाहिजे? कुठल्या गोष्टींची सोडवणूक करून घेतली पाहिजे, याबाबत शरद पवारांनी मार्गदर्शन केलं होतं, असा खुलासा छगन भुजबळांनी यावेळी केला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मविआ सरकारच्या काळात, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…;
…म्हणून आत्तापर्यंत मनसेशी युती केली नाही; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण
शरद पवार यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, केंद्र सरकारने…