डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

0
181

मुंबई :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे ज्या ठिकाणी आज तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चंही नुकसान केलंय.

दरम्यान, या घटनेचा सध्या सर्व स्तरातून तिव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक

‘हा’ महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय?; शरद पवारांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते; संजय राऊतांच फडणवीसांना उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here