आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : काल दुपारी, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
काल दुपारी कोरेगाव पार्कमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान जयंत पाटील यांच्यासह आणखी 2 आमदार या बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धातास ही बैठक सुरू होती., अशी माहिती समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : तब्बल 1 वर्ष, 5 महिन्यांनी नवाब मलिकांना जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे अजित दादांसोबत जाणार, अशा चर्चा सूरू आहेत. अशातच जयंत पाटील कालच्या बैठकीला उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील , अजित पवारांसोबत गेल्यानं जयंत पाटलांना मोठं मंत्रीपद मिळू शकतं. तसेच पक्षाचा प्रदेशाध्यक्षच अजित पवारांसोबत गेल्यास, मूळ राष्ट्रवादीच अजित पवारांकडे जाईल.
दरम्यान, जयंत पाटील हे शरद पवार यांच्या सहमतीशिवाय भाजपसोबत जाणार नाहीत. त्यामुळे शरद पवार यांना माहिती दिल्यानंतरच जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जातील, अशी माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अमित शहांनी संसदेत मूर्खपणा केला, एवढ्या मोठ्या नेत्यांनी…; बच्चू कडूंचं मोठं विधान
मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी ठाकरे – शिंदे गट आले पुन्हा एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“पंतप्रधानांबद्दलचं ‘ते’ विधान भोवलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला लोकसभेतून केलं निलंबित”