“…यामुळे फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल”

0
163

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

नितीन राऊत यांनी आज नागपूर शहर आणि ग्रामीण कायदा सुव्यवस्था येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांना ऑपरेशन लोटसबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांनी कोरोनाची परिस्थितीही अत्यंत संयमीपणे हाताळली आहे. आमचे आमदार खुश आहेत. त्यामुळे पाच वर्षे या सरकारला काहीही धोका नाही. त्यामुळे फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल, असं नितीन राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?”

अखेर ठरलं! पंकजा मुंडेंची दिल्ली वारी पक्की; सोबतच ‘या’ नेत्यांनाही दिल्लीत संधी

“हे सरकार पडणार नाही; मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनी आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत”

अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here