नवी दिल्ली : युजवेंद्र चहलबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर युवराज सिंगने माफी मागितली आहे. मी जात, वर्ण किंवा लिंगावरून कधीही असमानता केली नाही. माझं आयुष्य मी लोकांच्या कल्याणासाठी घालवलं आणि घालवत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी प्रत्येक व्यक्तीला आदर दिला, असं युवराज म्हणाला.
मित्रासोबत बोलत असताना केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. जबाबदार भारतीय म्हणून मी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ट्विट युवराजने केलं आहे.
दरम्यान, रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत असताना युवराज सिंगने चहलबाबत जातीवाचक टिप्पणी केली होती. यानंतर युवराजवर सोशल मीडियावर टीका झाली होती. तसंच ‘युवराज सिंग माफी मांगो’ हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेन्डिंगमध्ये होता. या वक्तव्यावरून युवराजविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली होती.
— yuvraj singh (@YUVSTRONG12) June 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर
अनुष्काचा हा फोटो पाहून विराट कोहली ‘क्लीन बोल्ड’; म्हणाला…
सोनू सूदचा चेहरा पुढे करून ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – संजय राऊत