Home महाराष्ट्र रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत

रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकण परिसराचे नुकसान झालं, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली होती, त्याच प्रमाणे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसराचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 कोटी रूपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी रूपये तात्काळ मदत जाहीर केली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

अनुष्काचा हा फोटो पाहून विराट कोहली ‘क्लीन बोल्ड’; म्हणाला…

सोनू सूदचा चेहरा पुढे करून ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – संजय राऊत

“मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”