मुंबई : लॉकडाउन काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने महत्वाची भूमिका बजावली. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोनु सूदवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. यावर मनसेचे नेते चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत? ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया. मनाचा मोठेपणा दाखवुया. रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार, असं म्हणत खोपकरांनी संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकारला’ अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे, असं चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात झाले, असं सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मा. संजय राऊत,
या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत?
ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया…
मनाचा मोठेपणा दाखवुया…
असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार… #बसारडत— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर
अनुष्काचा हा फोटो पाहून विराट कोहली ‘क्लीन बोल्ड’; म्हणाला…
सोनू सूदचा चेहरा पुढे करून ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – संजय राऊत
“मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”