उद्धव ठाकरे झुकले म्हणून मुख्यमंत्री झाले, सत्तेसाठी लाचार झालेल्यांनी…; रावसाहेब दानवेंची टीका

0
723

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी काहीही झालं तरी आम्ही झुकणार नाही, वाकणार नाही, मोडणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा सरकार चालतच राहील असं, संजय राऊत म्हणाले होते. त्याला प्रतुत्तर देताना आता भाजाप नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : संजय राऊतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा; नारायण राणेंचा आरोप

उद्धव ठाकरे झुकले म्हणून तर ते मुख्यमंत्री झाले. झुकणार नाही, वाकणार नाही, मान खाला घालून तिथे गेले आणि सरकारमध्ये सामील झाले. हे झुकणं नाही तर काय?, असा सवाल करत रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, बाळासाहेबांनी उभं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करण्यात घालवलं. उद्धव ठाकरेंनीही तसचं केलं आणि सरकारमध्ये झुकुण गेले नाहीतर कसे गेले. झुकले पण आणि वाकले पण. आता झोपायची पाळी आली. आता काय झुकायचं आणि वाकायचं राहिलं आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

 ‘…नाहीतर संजय राऊत सुधरणार नाही’; निलेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here