आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत, मात्र आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार का?, या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र यावरून आता ठाकरे गटाकडून हालचाली सूरू झाल्या आहेत.
ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरेंना धक्का; ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेची कारवाई
मनीषा कायंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाकडून, विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे याचिका सादर करणार आहे. याबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असून दोन-तीन दिवसांत ही याचिका सादर होईल, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्याने ‘माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्यानं आता विधानपरिषदेतील आणखी आमदार फुटू नयेत, यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती तयार करण्यात येत आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदार अॅड. अनिल परब आणि अन्य नेत्यांशी चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंनी बंड थांबवलं असतं, पण…; ‘या’ नेत्याचं मोठं विधान”
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात का केली?; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार