आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या बंडावर आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असतं. पण, गद्दारांना बरोबर का ठेवायचं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात का केली?; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असते. फार अवघड काम नव्हते. पण, उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ज्यांच्या मनात गद्दारी रुजली आहे, त्याला माझ्याबरोबर का ठेवायचं. एकनाथ शिंदे गेले, तेव्हा किती लोक होती? संध्याकाळी अर्धे लोक तर उद्धव ठाकरेंबरोबर वर्षा बंगल्यावर बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी ठरवलं असतं, तर काहीही झालं असतं., असंही अंबादास दानवेंनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार
जागतिक MSME दिना निमित्त ‘उद्योग – व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे’ आयोजन
मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही; ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर