आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यानंतर मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांनी शिवसेना पक्षात आहे. परंतु त्यानंतर मला या सत्तांतराच्या काळानंतर कधीही संधी देण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी माझे प्रश्न आहेत, ते डावलले जायचे. अनेक काम मला करायचे होते. त्यासाठी मी संधी मागत होते. परंतु ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही, असं मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
ही बातमी पण वाचा : देवेंद्रजी, हिंमत असेल तर…; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास होत असताना मला देखील विकासामध्ये यायचं होते. त्यासाठी मी आज निर्णय घेतला आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश घेतलेला आहे, असंही मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदा मनीषा कायांदे यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलं. अनेक जिल्ह्यातील महिला पदाधिकारी आनंद मठ येथे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला पदाधिकारी यांच्याकडून मनीषा कायंदे यांचे स्वागत करण्यात आलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; भाजपचा उध्दव ठाकरेंना सवाल
मोठी बातमी! मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश