मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दोन प्रतिभावंत फलंदाज म्हणून कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांना ओळखलं जातं. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये हे दोघे क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या दोघांच्या खेळीची कायम तुलना केली जाते. यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने ट्विटरवर प्रश्नोत्तराचे सत्र घेतलं.
ब्रॅ़ड हॉग याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातच त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये रोहित आणि विराट यांच्यात चांगला फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे त्याने कारणासहित उत्तर दिले.
दरम्यान, विराट कोहली हा विलक्षण खेळाडू आहे. तो तंदुरुस्त असून ताकदवान आहे. क्रिकेटसाठी हे दोन्ही गुण महत्त्वाचे असतात. मर्यादित षटकांचा प्रश्न आला तर त्यात मला असं वाटतं की विराट कोहली हा जास्त चांगला फलंदाज आहे. आव्हानांचा पाठलाग करण्याची जेव्हा टीम इंडियावर जेव्हा वेळ येते, तेव्हा विराटच्या कामगिरीत सातत्य असतं. तो सातत्याने चांगली खेळी करून दाखवतो, असं हॉग म्हणाला.
महत्वाच्या घडामोडी-
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“…तर लॉकडाउनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल”
आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…
करोना रूग्णांची आकडेवाडी कमी दाखवून फायदा नाही; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र