आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भंडारा : एक दु:खद बातमी समोर येत आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते.
अवसरे हे काल भाजपची भंडारा येथील बैठक आटोपून मुलीच्या घरी मुक्कामासाठी गेले होते. पण तिथे त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने भंडारातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
ही बातमी पण वाचा : भाजपाने २०१९ साली शिवसेनेबरोबर युती करण्याची गरज नव्हती; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
दरम्यान, रामचंद्र अवसरे हे 2014 ते 2019 या कालावधीत ते भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते; राष्ट्रवादीच्या आमदारानं मनसेला डिवचलं”
पंकजा मुंडेंशी बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसे यांची भूमिका बदलली, म्हणाले…