आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : आगामी निवडणूकीसाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता सोलापूरमध्ये काँग्रसनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.
सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी आज भाजपला धक्का देत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
ही बातमी पण वाचा : …म्हणून शिवसेना-भाजप युती राहिली नाही; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान
दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर निंबर्गी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला यांचा मला आनंद आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवानी यांच्या विचाराने भारावलेले होतो. पण मागील 7 वर्षांपासून पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे. त्याला कटाळून मी भाजप पक्षातून बाहेर आलो, असं अशोक निंबर्गी यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘…तर मी विधानसभेचा राजीनामा देईन’; आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान
2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
RBI चा मोठा निर्णय; 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाद, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार