आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. निर्णयावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हा शरद पवार यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक प्रश्न आहे. या स्टेजला यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये बरंच मंथन चाललं आहे. एकदा नेमकी परिस्थिती काय आहे ते समोर आल्यावर बोलणं योग्य ठरु शकेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही बातमी पण वाचा : “मी राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”; शरद पवारांची मोठी घोषणा
“हे काय होतंय, का होतंय, या सर्व गोष्टी समोर येतील तेव्हा आम्ही यावर बोलणं योग्य ठरेल. शरद पवार यांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. पण मलाही पुस्तक लिहायचं आहे. मी त्यामध्ये योग्य गोष्टी लिहिणार आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय ते मी पुस्तकात लिहीण, असं देवेंद्र फडणवीस यांनी वेळी म्हंटलं आहे.
दरम्यान, आम्ही घडामोडींकडे लक्ष देऊन आहोत. योग्यवेळी प्रतिक्रिया देऊ”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
RCB कडून अनुष्का शर्माला स्पेशल बर्थडे गिप्ट; निर्णायक सामन्यात RCB चा लखनाैवर 18 धावांनी विजय
…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान
…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान