आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीग्रस्त आंदोलकांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवार यांना सांगितलं. त्यानंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन राज्य सरकारची काय भूमिका आहे, हे शरद पवार यांना सांगितले.
ही बातमी पण वाचा : “…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”; बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान
काल बारसू रिफायनरी येथील आंदोलकांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार आज शरद पवार यांना भेटण्याचं ठरलं होतं. तिथली वस्तूस्थिती काय आहे, हे शरद पवार यांना सांगितलं, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
अडीच वर्षात दमडी सुद्धा या ठाकरे सरकारने फेकून मारलेली नव्हती; भाजप नेत्याची टीका
आता तरी, लोकांना खात्री पटली की, राष्ट्रवादीनंच शिवसेना संपवली; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा
…यासाठी उद्धव ठाकरेंनी 5 कोटी घेतले; नारायण राणेंचा मोठा आरोप