Home देश उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार-खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांचं यावेळी अतिशय उत्साहात उत्तर प्रदेश सरकारकडून स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री, तसेच भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आले होते. शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळाबाहेर दाखल झाले होते. अतिशय वाजतगाजत एकनाथ शिंदे यांचं लखनौमध्ये स्वागत करण्यात आलं. लखनाैमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

ही बातमी वाचा : “चेन्नई एक्सप्रेस सुसाट! रहाणेच्या वादळी खेळीमुळे, चेन्नईचा मुंबईवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

एकनाथ शिंदे यांना आम्ही अयोध्या दाखवली, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येतेय. यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जोरदार उत्तर दिलं. त्यांना जनतेनं घरचा रस्ता दाखवला. मी त्यावर उद्या सविस्तर बोलतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते टी.व्ही 9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा रामलल्लांच दर्शन घ्यायला येतोय. मी खूप समाधानी आहे. खूप आनंदी आहे. अयोध्या आणि रामलल्लांचं दर्शन हे राजकीय विषय नाहीत. श्रद्धा, भक्ती, भावना आणि अस्मितेचा विषय आहे. अयोध्या यात्रेचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये. फक्त दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी 

“काँग्रेसला धक्यावर धक्के, आता ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

आधी शरीरसंबंध ठेवले आणि मग…; नवी मुंबईत रिक्षा चालकाचं संतापजनक कृत्य

17 तास नॉट रिचेबल का होते? अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…