आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार येऊन आता नऊ महिने झाले.मात्र दोन्ही पक्षात नाट्यनाराजी समोर आली आहे.
भाजप खासदाराने शिंदे सरकारच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे युतीतील नाराजीनाट्य समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली? आदित्य ठाकरेंचा सवाल
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रम पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व खासदारांना बोलवले नाही. यामुळे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आली आहे. या योजनेसाठी केंद्राने बजेट दिले आहे. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र येईल, असं खासदार उन्मेष पाटील यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी
मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाण्यात जोरदार राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….