Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली? आदित्य ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली? आदित्य ठाकरेंचा सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. यावर  माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

भाजपा किंवा शिवसेना असेल इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते आहे त्यावर काहीही कारवाई होत नाही हे दुर्दैवी आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपाच्याच कार्यकर्त्याला मारहाण होते आणि कारवाई होत नाही याला काय म्हणायचं? पोलिसांवर इतका दबाव कुणाचा आहे? 55 लोकं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. आत्तापर्यंत असं वाटायचं की भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तर केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडी वगैरे पडतील का? पण आता तर ही भीतीच राहिलेली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

गृहमंत्री स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नसतील, हल्ल्यांपासून वाचवू शकत नसतील तर नागरिकांनी करायचं काय? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

ठाण्यात जोरदार राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….

मराठमोळ्या ऋुतुराज-तुषारपुढे लखनाै हतबल, रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा लखनाैवर 12 धावांनी विजय