आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. या हल्यात जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्पितळात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
मिंधे गटाची गुंडगिरी वाढत चालली आहे. ठाण्यामध्ये पत्रकाराला धमकी देण्यात आली होती. पत्रकाराला धमक्या दिल्या जातात. महिलांना मारहाण केली जाते. अशी मारहाण होत असेल तर गृहमंत्र्याला पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर लगेच बाजूच्या राज्यात जाऊन अटक केली जाते. मग इथे दुसरा न्याय का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
ही बातमी पण वाचा : ठाण्यात जोरदार राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
एकूणच गुंडागर्दीचे राज्य सुरु आहे. आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंड मंत्री म्हणायचं असे मी नाही म्हणत. पण, असे म्हणायचे की नाही हे लोक ठरवतील. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना असे आणखी एक खात निर्माण करावं. गुंड मंत्री असे खाते निर्माण करून गुंड पोहचण्याच काम त्या मंत्र्याकडे द्यावं, असा घणाघातही उध्दव ठाकरे यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी
संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….
मराठमोळ्या ऋुतुराज-तुषारपुढे लखनाै हतबल, रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा लखनाैवर 12 धावांनी विजय
“मविआला मोठा धक्का, कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”