मुंबई : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातही 30 जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून मला दु:ख होतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्रात भयावह स्थिती नाहीये. दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, आजपर्यंत महाराष्ट्रात 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 34 हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यात 24 हजार रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल”
“पुन:च्छ हरिओम करायची वेळ आली आहे; हळूहळू आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करु”
तो निर्णय अजित पवार यांचाच होता- प्रफुल्ल पटेल