Home महाराष्ट्र तो निर्णय अजित पवार यांचाच होता- प्रफुल्ल पटेल

तो निर्णय अजित पवार यांचाच होता- प्रफुल्ल पटेल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापेक्षा सत्ता स्थापनेदरम्यान झालेल्या घटनामुळे महाराष्ट्राचं राजकारण रंगतदार वळणार पोहोचलं होतं. ऱाष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सगळ्यांनाच आर्श्चयाचा झटका बसला होता. अजित पवार यांनी घेतलेल्या त्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक तितकं संख्याबळ नव्हतं. त्यामुळे आम्ही विरोधी बाकांवर बसणार होतो. पण, नंतर शिवसेना आणि भाजपात मतभेद सुरू झाली. त्याचदरम्यान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असावी. सरकार स्थापन करू शकत नाही, त्यामुळे आमच्यासोबत या, अशी चर्चा फडणवीस यांनी केली, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

भाजपासोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा असा कोणताही विचार नव्हता. पण, भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय हा स्वतः अजित पवार यांचाच होता. काही गोष्टींवर पडदा असलेला बरा, यात लपवण्यासारखं काही नाही, असंही प्रफुल्ल पटेल म्हटले.

महत्वाच्या घडामोडी 

…म्हणून शिवसेना आज भाजपासोबत नाही- संजय राऊत

“सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू”

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…

रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढतंय- देवेंद्र फडणवीस