आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अचानक प्रकृती बिघडल्यानं भजबळ यांना तातडीनं हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हे ही वाचा : माजी क्रिकेटर केदार जाधवचे वडील पुण्यातून गायब; मोबाईलही बंद असल्यानं केदार टेन्शनमध्ये
दरम्यान, छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर तातडीने त्यांना, वाटेतच, अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील तरुणाने घातली राज ठाकरेंना साद, म्हणाला… तर हिंदूंचे भविष्य वाचेल
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण