Home महाराष्ट्र आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. मात्र, गरजेल तो बरसेल का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : संदीप देशपांडेवर ज्याने हल्ला केला, त्याला…; वर्धापन दिनी राज ठाकरेंचा धमकीवजा इशारा

आमच्या सरकारच्या काळात कोरोना होता. केंद्र सरकारकडून जीएसटीचा मोठा परतावा येणे बाकी होते. आता महाशक्तीचा पाठिंबा असलेले हे सरकार कसा कारभार करते ते पाहिले आहे. मी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांशी बोलत होतो. मध्यंतरी जो पाऊस झाला, त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, अजूनही हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी गेलेले नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला. सर्व घटकांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईमध्ये पावसाचा गडगडाट झाला. मात्र, पाऊस काही पडला नाही. त्यामुळे गरजेल तो बरसेल का? एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा आहे., असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“महाबजेट 2023! राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, देवेंद्र फडणवीसांनी केल्या, ‘या’ महत्त्वाच्या घोषणा”

“शिंदेंनंतर आता मनसेकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसेचा भगवा झेंडा”

” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला नाही, तर…”