आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपसह, शिंदे गटातील नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांनी हा वाद शांत झाला होता. यानंतर आता परत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा वाद पुन्हा उकरून काढला आहे.
हे ही वाचा : “कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांविषयी बोलताना खालच्या भाषेत टीका केली आहे. संभाजी महाराज धर्मवीर नसते तर, ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ असं म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं.” संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला
“फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”