आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
पंढरपूर : आगामी महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी, ठाकरे गट, शिंदे गट, भाजप, मनसे या सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली असून सर्वच पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग, आउटगोईंग सूरू आहे. याचाच प्रत्यय आता स्वाभिमानी पक्षालाही आला आहे.
पंढरपूरमध्ये स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी पक्षातील नेत्याने पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजू पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
हे ही वाचा : “नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; सत्यजित तांबेंचा शुभांगी पाटलांना धक्का, तांबे तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर”
रणजित बागल हे पंढरपूरमधील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अशातच काही दिवसांपूर्वी बागल यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे बागल हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बागल यांनी शिवबंधन हाती बांधल्यास पंढरपूरमध्ये ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”
“अभिनयानंतर आता राजकारणात एंट्री; ‘या’ मराठमोठ्या अभिनेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
“…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”