Home महाराष्ट्र नागपूर निकालावरून राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

नागपूर निकालावरून राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : “नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; सत्यजित तांबेंचा शुभांगी पाटलांना धक्का, तांबे तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

विधान परिषदेचा हा निकाल राज्यातील सत्ताधाऱ्यांना चपराक लगवण्यासारखा आहे. भाजपच्या हक्काच्या जागा पण अडचणीत आल्या आहेत. त्यामुळेच राज्याचा हा निकाल सत्ताधाऱ्यांना योग्य धडा शिकवणारा आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीतला नागपूरचा निकाल हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचार करायला लावणारा आहे असा खोचक टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”

“अभिनयानंतर आता राजकारणात एंट्री; ‘या’ मराठमोठ्या अभिनेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”