आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटात वाद निर्माण झाला होता. या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
“वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो,” असं करत संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?; खुद्द एकनाथ खडसेंनी केला खुलासा, म्हणाले…
दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अटीवर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवर दसरा मेळावा 5 ऑक्टोबरला होणार आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1573516588762169344?t=JSCHbwoHMJ3ER-7ze5D0Fw&s=19
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
नारायण राणे थर्ड क्लास व्यक्ती आहे; शिवसेनेची टीका
