आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि शिवसेना पक्षाला खिंडार पडलं. या गोष्टीला आता सहा महिने झाले आहेत. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टीका होत आहे.
अशातच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे हे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. यावेळी ठाकरेंनी केसरकरांना जाब विचारल्याचं पहायला मिळालं. या भेटीवर आता केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरे विधानभवनात भेटले तेंव्हा ते…; दीपक केसरकरांनी सांगितलं, ‘त्या भेटीत नेमकं काय घडलं?”
उद्धव ठाकरे यांनी कटुता कमी करण्याचा सल्ला यावेळी केसरकरांनी यावेळी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण केलं तर एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असं मोठं विधान केसरकरांनी यावेळी केलं. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.
नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे, तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं पाहिजे. आणि तसं झालं तर मग शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान केसरकरांनी यावेळी दिलं. दरम्यान, केसरकरांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“किरीट सोमय्या आक्रमक?; रश्मी ठाकरेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, ठाकरेंच्या अडचणीत वाढ”
अपघात नेमका कसा झाला?; ऋषभ पंतने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला, ओव्हरस्पिडमुळे नव्हे तर…
मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट