आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेचे पुण्यातील माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझिरे यांची मनसेने पदावरून हकालपट्टी केली होती.
पदावरून दूर केल्यानंतर माझिरे यांनी जवळपास 400 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मनसेला राम राम ठोकला. त्यानंतर माझिरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आता माझिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”
दरम्यान, शिंद गटात प्रवेश करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझिरे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. माझिरे यांना शिंदेंनी, माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. माझिरे यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
नितेश राणे, तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…; मनसेचं, राणेंना जोरदार प्रत्युत्तर
“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी व भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”