आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा : “‘राज’ सरकार!; राज ठाकरेंनी केली मध्यस्थी, अन् ‘त्या’ पोलिसांचे निलंबन मागे”
मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही प्रत्येकवेळी राजकीय नसते. असं झालंच तर अनेक जणं घरी बसतील”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी इंदू मिलबाबत चर्चा करण्यासाठी माझी भेट घेतली होती. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे इन्स्टिट्यूशन सुरू करण्याची मागणी केली”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.
काँग्रेस सरकारने ते केलं नाही. आता मुख्यमंत्र्यांसोबत इन्स्टिट्यूशन उभं करण्यासंदर्भात चर्चा झाली. पुतळ्याबाबत काही आक्षेप होते. त्याची कल्पना दिली. त्यासाठी समिती नेमून त्या पुतळ्याची पाहणी ते करतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं, शिवसेना आता आमच्यासोबत येत आहे. काँग्रेसच्या सोबत कायम भांड्याला भांड लागलं. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मातोश्रीचा सोंगाड्या, जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री…; मनसेचा सुषमा अंधारेंवर पलटवार
शरद पवारांनी मदत केली नसती तर, आनंद दिघे हे कधीच…; जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
भाजपाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?