…याला म्हणतात कॅप्टन्सी; विराट कोहलीनं शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर शमीनं असं काही केलं की…

0
363

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

केपटाऊन : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. तसेच कोहली ज्यावेळी फलंदाजीसाठी क्रीजवर असेल किंवा कॅप्टनसी करत असेल तर प्रतिस्पर्धी संघ हा नेहमीच दबावाखाली असतो. आज केपटाऊन कसोटीमध्ये याचा प्रत्यय दिसून आला.

दक्षिण आफ्रिकन फलंदाज टेंबा बावुमा आणि किगन पीटरसनची जोडी मैदानात जमली होती. त्यांनी 42 धावांची भागीदारीही केली होती. त्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. मात्र ही विकेट शमीने घेतली असली, पण शमीला तशी गोलंदाजी करण्यासाठी प्रेरित केलं ते कोहलीनं.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”

कोहलीनं टी-ब्रेकच्या आधीच्या सत्रात सर्व क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांमध्ये जोश निर्माण केला. तसेच विराटने यावेळी डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनाही टाळ्या वाजवायला सांगितल्या. याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कोहलीने खेळाडूंमध्ये जोर भरताच भारतीय गोलंदाजांच्या बॉलिंगलाही धार आली. त्यानंतर लगेजच शमीने जम बसलेल्या बवूमा-पीटरसनच्या जोडीला फोडलं. 56 व्या षटकात शमीनं एका सुंदर आऊटस्विंगरवर बवुमाला बाद केलं. बवुमाचा कॅच कॅप्टन कोहलीने घेतला.

महत्वाच्या घडामोडी – 

“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”

“औरंगाबादमध्ये मनसेची जोरदार मोर्चेबांधणी, शहरात दोन नव्या शाखांची स्थापना”

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here