आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मी मिटिंगसाठी स्मशानात येईन. पण, मनसेच्या पुणे शहर कार्यालयात येणार नाही, असं वक्तव्य पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी केलं आहे.
“माझ्या नाराजीसाठी शहर कार्यालय जबाबदार आहे. मी आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांना वेगवेगळं मिटिंगला बोलावण्यात आलं. जिथं फूल वेचली, तिथं काटे वेचायला जाणार नाही, असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी शहर कार्यालयातही जाईन, असंही वसंत मोर यांनी यावेळी म्हटलं आहे.
पुणे शहरात 25 नगरसेवक निवडून आल्यानंतर मला तिथं पेढे वाटता येतील, असं वाटलं. पण, वसंत मोरे यांचं पद काढल्यानंतर पेढे वाटले गेले. यामुळं मला मनसेच्या शहर कार्यालयात जावसं वाटत नाही, असं वसंत मोरे यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : “आई-बाबा घरी नाहीत तू ये…; प्रेयसीनं बोलवताच प्रियकर गेला आणि त्याच्यासोबत जे घडलं ते…”
दुसरी बाजू ऐकूण घेण्यासाठी मला बोलावण्यात आली. माझी अमित ठाकरे यांच्यासोबत पहिली भेट आहे. शहर कोअर कमिटीच्या बैठका या आधी बाहेर व्हायच्या. मग आता शहर कार्यालयातच मिटिंग व्हावी, असा अट्टाहास का?, असा सवालही वसंत मोरे यांनी यावेळी केला.
शहरातील कुठल्याही शाखाध्यक्षाच्या घरी चला. मी यायला तयार आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन मिटिंग घेऊ. शहर कार्यालय सोडून कुठही मिटिंगला येण्यास तयार असल्याचंही वसंत मोरे यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हे पक्षातील नाराजीमुळे वसंत मोरे चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Election Result! “मोदींना मोठा धक्का; ‘या’ राज्यात काँग्रेस आघाडीवर”